✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते २५ डिसेंबर आणि १५ जानेवारी ते२५ जानेवारी या कालावधीत दोन टप्प्यात “गोवर रूबेला” लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये डोस पासून वंचित राहिलेल्या मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांनी आज येथे दिली.

जिल्ह्यात गोवर रूबेला लसीकरणाचे काम सुरू असून नोव्हेंबर २०२२ अखेर ४२४० मुलांना पहिला डोस, तर ४०१५ मुलांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच गोवर रूबेला लसीकरणाबरोबरच अ जीवनसत्व चा डोस देण्यात आला आहे. यामध्ये ९ महिने ते ११ महिने वयोगटातील बाळाना पहिला आणि १६ ते २४ महिने वयोगटातील मुलांना दुसरा डोस देण्यात येत असून २६ जानेवारी २०२३ पर्यंत १०० टक्के मुलाना गोवर रूबेला लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ज्या मुलांचे अद्यापही गोवर रूबेला लसीकरण झालेले नाही अशा वंचित मुलांसाठी १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत पहिला टप्पा आणि १५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत दूसरा टप्पा, अशा दोन टप्प्यात जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी अद्यापही ज्या मुलांचे गोवर रूबेला लसीकरण पहिला व दुसरा डोस घेणे शिल्लक आहे अशा वंचित मुलांच्या पालकांनी आपल्या बाळाला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन लसीकरण पूर्ण करून घ्यावे.

जिल्ह्यात कामानिमित्त येणाऱ्या बांधकाम व अन्य कामगारांच्या लहान मुलांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर लहान मुलांच्या अंगावर पुरळ व ताप असणाऱ्या मुलांचा सर्वे करण्यात येत आहे. या सर्वे मध्ये आढळणाऱ्या संशयीत बाळांचे सॅम्पल तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येत आहे. अशा प्रकारे आतापर्यंत जिल्ह्यातील ३८ संशयित बाळांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

गोवर रूबेला लसीकरण मोहिमेला सहकार्य करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते २५ डिसेंबर आणि १५ ते २५ जानेवारी अशा दोन टप्प्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान मुलांना गोवर लसीकरणाचा डोस देऊन आपल्या मुलांना गोवर रूबेला या आजारा पासून संरक्षित करा. त्यासाठी नागरिकांनी लसिकरन मोहिमेला सहकार्य करावे. असे आवाहन माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page