✍🏼लोकसंवाद /- मालवण.

” सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिलेले असुन येथे फळप्रक्रियेस मोठया प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे येथील तरुणांनी नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे येथे न जाता येथील उपलब्ध फळे आंबा, काजू, फणस, कोकम यासारख्या विविध फळांवरील छोटी फळप्रक्रिया युनिट प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमार्फत सुरु करावीत.” असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. एस. दिवेकर यांनी काळसे येथे केले.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या काळसे येथील लाभार्थी साक्षी परब यांच्या काजू प्रक्रिया विस्तारीकरण केलेल्या युनिटचे उद्घाटन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग डी. एस. दिवेकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी साक्षी परब यांनी आपल्या प्रक्रिया युनिटची माहिती उपस्थितांना दिली या प्रक्रिया युनिटमुळे आपण गावातील 7 महिलांना रोजगार देत असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्ति अरिता तेंडोलकर यांनी सहकार्य केले असून योजनेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. एस. दिवेकर, यांच्या सह, नोडल अधिकारी स्मार्ट, सिंधुदुर्ग एल. के. कुरकुटे, मालवण तालुका कृषि अधिकारी व्ही. जी. गोसावी, कॅनरा बँक शाखा धामापूरच्या व्यवस्थापक श्रीम. गावसकर, कृषि पर्यवेक्षक डी. डी. गावडे, कृषि सहाय्यक व्ही. आर. कुबल, एस. व्ही. चौखंडे, एम. बी. गिते, पी. के. सौंगडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एन. एम. गोसावी व साक्षी परब यांच्या गटातील महिला वर्ग आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page