✍🏼लोकसंवाद /- मुंबई.

नांदगाव येथे झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी आपल्या माध्यमातून देण्यात आलेल्या उमेदवाराला निधी द्या,अन्यथा मी आमदार निधी देणार नाही,असे सांगितले होते.मात्र याबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांना विचारले असता तयनी नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य हे…..

धमकी म्हणता येणार नाही. एखाद्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना आपण हक्काने लोकांना सांगतो. त्यामुळे त्याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारसंघातील लोक आपल्यावर प्रेम करत असतात. आपण विकास कामासाठी निधी देत असतो. त्यामुळे ते हक्काने तसे बोलले असावे. त्यामुळे त्याचा गैर अर्थ काढण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page