✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली.

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जवळपास लागले आहेत. आम आदमी पार्टी 122 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भारतीय जनता पक्ष 107 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला दुहेरी आकडाही स्पर्श करता आलेला नाही. या निवडणुकीत भाजपच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला गेला असला तरी काही ठिकाणचे पराभव आपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. आम आदमी पक्षाचे मजबूत नेते आणि दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारमधील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पटपरगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

त्यांच्या परिसरात एकूण 4 वॉर्ड आहेत. या सर्व प्रभागात भाजपच्या उमेदवारांनी आपच्या उमेदवारांचा पराभव केला. प्रभाग 196 मयूर विहार-2 मध्ये भाजपचे उमेदवार बिपीन बिहारी विजयी झाले आहेत. दुसरीकडे, भाजपच्या रेणू चौधरी यांनी आपच्या उमेदवाराचा पराभव करत 197-पतपरगंजवर कब्जा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page