मुंबई /-
विधानसभा निवडणुकांमध्ये धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची अनेक वृत्त आली. मध्यंतरी तर त्या भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र आज भाजपतर्फे पक्षांतर्गत बदलांची घोषणा करण्यात आली असून नव्या टीममध्ये पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पंकजा मुंडे यांची पक्षाने राष्ट्रीय सचिवपदी निवड केल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चाही थांबल्या आहेत. पक्षाने मोठी जबाबदारी दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनीही पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असल्याने मुंडे व भाजपदरम्यान सर्व काही आलबेल असल्याचेच संकेत मिळाले आहेत.
केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचे आभार मानले आहेत.त्या लिहतात, ‘पक्षाच्या सर्व केंद्रीय नेतृत्वाचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबाबत व भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मला त्यांच्या नव्या टीममध्ये स्थान दिल्याबद्दल धन्यवाद.