कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने आठवडा बाजारात व्यापार करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी या मोहिमेमध्ये हस्तक्षेप करून आमचा मोहिमेला विरोध नाही तर जे सर्वसाधारण सभेमध्ये ठरले आहे त्याप्रमाणे कार्यवाही करा अशी मागणी केली जोपर्यंत व्यापाऱ्यांसाठी बैठक व्यवस्थेचे नियोजन होत नाही तोपर्यंत कार्यवाही करू नये अशी मागणी केली तसेच कोल्हापूर भागातून आलेल्या व्यापाऱ्यांजवळ प्रमाणपत्र नसताना त्यांना व्यापार करायला कसे काय दिले जाते असाही सवाल भाजपचे नगरसेवकांनी उपस्थित केला.

कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने आज बुधवार ३० नोव्हेंबर रोजी रस्त्यालगत बसलेल्या व्यापाऱ्यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली ही मोहीम पोलीस ठाणे या परिसरात बसलेल्या व्यापाऱ्यांना हटविण्यापासून सुरुवात केली यावेळी प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते

या मोहिमेमध्ये भाजपचे नगरसेवकांनी हस्तक्षेप केला या मोहिमेला विरोध नाही पण जे सभेमध्ये ठरले त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी असे प्रशासनाला सांगितले पानबाजारामध्ये कोल्हापूर वरून अनेक व्यापारी येतात त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र नसते मात्र त्यांच्यावर कोणती कार्यवाही होत नाही मात्र स्थानिक व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे यावेळी भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी सांगितलेली सभेमध्ये बुधवारच्या दिवशी डंपर दुसऱ्या रस्त्याने वळविण्याची मागणी केली होती आणि तशा प्रकारे पोलीस ठाण्यात पत्र देण्यासंदर्भात सांगितले होते मात्र त्यावर कोणती कारवाई झाली नाही तसेच ज्यांना प्रमाणपत्रे ज्या ठिकाणाची दिले आहेत त्या ठिकाणी इतर व्यापारी येऊन व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कार्यवाही होत नाही असे सांगितले तर नगरसेविका सौ संध्या तेरसे यांनी सांगितले की, सभेमध्ये भाजी विक्रेत्यांना ठिकाणे ठरवून दिली जाणार होती आणि तशी कार्यवाही केली जाणार होती मात्र तसेही घडले नाही सभे नुसार काही होत नाही मात्र व्यापाऱ्यांना हटवण्यासाठी प्रशासन काम करते त्याचप्रमाणे नगरसेवक निलेश परब व राजीव कुडाळकर यांनी सुद्धा प्रशासनाला धारेवर धरले आणि कोल्हापूरवरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना आधी हटवा आणि मग इतर व्यापाऱ्यांना अशी मागणी केली व्यापाऱ्याने व्यापाऱ्यांनी सुद्धा या कार्यवाहीला कडाडून विरोध केला. त्यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले.

फोटो:- व्यापाऱ्यांना असल्याबाबत प्रशासनाशी चर्चा करताना भाजपचे नगरसेवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page