✍🏼लोकसंवाद /- मालवण.

आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी वार्षिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने तर रात्रौ ठिक ९.३० वाजता भव्य जिल्हास्तरीय गृपडान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी प्रथम पारितोषिक पंधरा हजार, द्वितीय पारितोषिक दहा हजार, तृतीय सात हजार तसेच तीनही क्रमांकाना शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स गिरीश बाणे, उमेश बाणे यांच्या तर्फे आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. यासाठी प्रथम येणाऱ्या बारा संघांना प्रवेश दिला जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क अर्जुन बापर्डेकर ९४२००८२३२०/८७६६४३९२८८ विजय कदम- ९४२१०३७७१२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page