जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी..

जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा कोविड रुग्णालयाच्या ठिकाणी अद्ययावत ऑक्सिजन प्लांट ची उभारणी करण्यात येत आहे.पालकमंत्री उदय सामंत यांनी यासाठी ७२ लाख रु ची तरतूद केली आहे.ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.आज आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली.

या ऑक्सिजन प्लांट मुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही तसेच सद्यस्थितीत कोविड रुग्णांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. यावेळी आ.वैभव नाईक यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिकारी शाम पाटील यांच्याशी चर्चा करत कोविड रुग्णांचा आढावा घेतला.आवश्यक सूचना यावेळी त्यांनी केल्या. याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..