विकास कुडाळकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

विकास कुडाळकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

कुडाळ /-

शिवसेना पक्षप्रमुख,राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वये व खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार माजी जी.प.अध्यक्ष विकास कुडाळकर (रा.पिंगुळी कुडाळ) यांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिलेले निवडीचे पत्र आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी विकास कुडाळकर यांना देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे विकास कुडाळकर यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते , तालुकाप्रमुख राजन नाईक, संतोष शिरसाठ, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, उपसभापती जयभारत पालव, संजय भोगटे, बबन बोभाटे, राजू गवंडे, सचिन काळप, सरपंच निर्मला पालकर,भरत परब ,रामदास करंगुटकर,शोहेब खुल्ली, सतीश धुरी ,चेतन राणे, मिलिंद परब, विष्णू धुरी, उपसरपंच सागर रणसिंग, सिद्धेश धुरी, महेश पालकर, प्रमोद पांगुळ, बबलू पिंगुळकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..