किरकोळ कारणावरून आरोग्य सेवकास मारहाण.;धुरीवाडा येथील घटना ;६ संशयितांवर पोलिसांतगुन्हा दाखल…

किरकोळ कारणावरून आरोग्य सेवकास मारहाण.;धुरीवाडा येथील घटना ;६ संशयितांवर पोलिसांतगुन्हा दाखल…

मालवण /-

किरकोळ कारणावरून मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक सिद्धेश सुहास धुरी (वय-२६) याला सहा जणांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना काल रात्री घडली. यात धुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित सहा जणांविरोधात मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धुरीवाडा येथे घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी- काल रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास आरोग्य सेवक सिद्धेश धुरी हे दुचाकीवरून धुरीवाडा येथून जात असताना जॉन्टी फर्नांडीस याने धुरी यांना दुचाकी थांबवायला सांगितली. सिद्धेश याने दुचाकी थांबविल्यावर जॉन्टी फर्नांडीस, नैवल घोन्सालविस, ऑल्विन फर्नांडीस, सिद्धी पाताडे, पवन शिर्सेकर, माल राय या सहा जणांनी सिद्धेश यांना मारहाण केली तसेच शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिद्धेश धुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जॉन्टी बावतीस फर्नांडिस (रा.धुरीवाडा), नेविल कैतान घोन्सालविस (रा. रेवतळे), ऑल्विन फर्नांडीस (रा. सेवांगण रोड, धुरीवाडा), सिद्धी पाताडे (रा. कृष्णमंदिर धुरीवाडा), पवन भिकाजी शिर्सेकर (रा. धुरीवाडा), माल राय (रा. आजगाव वेंगुर्ला) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलिस करत आहेत.

अभिप्राय द्या..