कुडाळ पंचायत समितीच्या वतीने श्रावणमेळा निमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन.

कुडाळ /-

१ऑगस्ट 2022, पहिल्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून कुडाळ पंचायत समितीच्या वतीने..विधवा प्रथा बंद…चाल तू पुढे! मिशन वात्सल्य….श्रावणमेळा.. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महालक्ष्मी हॉल, पंचायत समितीच्या बाजूला कुडाळ येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमाला 600 विधवा महिला, 300 सुहासिनी महिला, 100 कुमारिका महिला अशा किमान 1000 महिला उपस्थित राहणार. सर्व सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी, यांनाही निमत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने गेल्यावर्षी श्रावणमेळा अंतर्गत दशावतार, भजन, किर्तन, ठाकर-आदिवासीकला , चित्रकथी, धनगरी नृत्य, फुगडया इत्यादी लोककलांना उर्जितावस्था आणण्यासाठी , त्यांचे संवर्धन होण्यासाठी तसेच या लोककलांच्या माध्यमातून ज्यांनी समाजप्रबोधन केले अशा कुडाळ तालुक्यातील वृद्ध कलाकारांची लोककला जनतेसमोर यावी , त्यांचा आदरसत्कार करणे , सन्मान करणे व त्यांच्यातील कला सादरीकरणास व्यासपिठ निर्माण करणेच्या उद्देशाने श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी , क्रांती दिन तसेच आदिवासी लोककला दिनाचे औचित्य साधून 174 कलाकारांचा श्रावणमेळा कलाकारांसाठी ख-या अर्थाने स्नेहमेळा , चैतन्यमेळा ठरला होता तसाच आगळावेगळा उपक्रम राबवावा या अनुषंगाने विधवा प्रथा बंद…चाल तू पुढे!
मिशन वात्सल्य….श्रावणमेळा..
आयोजित करण्यात आला आहे
याबाबत माहिती देताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले कुडाळ तालुक्यातील सर्व 68 ग्रामपंचायत नी विधवा प्रथा बंदीचे ठराव जिल्ह्यात सर्वात प्रथम 25 जून पूर्वी केले आहेत. पण संपूर्ण तालुक्याचा जाहीर ठराव व चळवळ, प्रचार असा कार्यक्रम घेत आहे.या कार्यक्रमाला 600 विधवा महिला, 300 सुहासिनी महिला, 100 कुमारिका महिला अशा किमान 1000 महिला उपस्थित राहणार. सर्व सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी, यांनाही निमत्रित केले आहे.अकाली आलेले वैधव्य आणि अनिष्ट रूढी, परंपरा यांच्यावर विविध लोक कला आणि स्कीट द्वारे आसूड ओढणारे हृदयस्पर्शी महिलांचे कार्यक्रमही यावेळी होणार आहेत वैधव्याने खचून नं जाता नव्या उमेदीने..तू चाल पुढे.. ऊर्जा आणि उमेद देणारे महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.वैधव्यामुळे अनिष्ट रूढीना बळी पडलेल्या अभागिनीचे काळीज पिळवठून टाकणाऱ्या व्यथाही या कार्यक्रमात ऐकल्या जाणार आहेत.अवेळी वैधव्य आले तरी संघर्ष करीत अनिष्ट रूढी झुगारून खंबीर उभ्या राहिलेल्या विरंगणाच्या यशोगाथाचा कार्यक्रमही होणार आहे मिशन वात्सल्य.. अंतर्गत विविध योजनाचे लाभार्थी निवड करून त्यांचे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत.सिंधुदुर्ग मधील पहिल्या तृतीय पंथी शिक्षिकेच्या धाडसला सलाम करून गौरव होणार आहे . समाजातील अनिष्ठ प्रथा झुगारून उभ्या राहिलेल्या क्रांतिदूत महिलांचा गौरव या वात्सल्य कार्यक्रमात होणार आहे कुडाळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत नी ग्रामसभेत विधवा प्रथा बंदीचे ठराव केले असून तमाम कुडाळ तालुकावासियांच्या साक्षीने विधवा प्रथा बंदी स्वीकारणारा महाराष्ट्रातील पहिला तालुका शपथ व ठराव घेऊन जाहीर करण्यात येणार आहे

स्त्री ही माता, भगिनी आणि अर्धांगिनी आहे श्री.चव्हाण.

भारतीय स्त्रीला गुलामगिरीतून मुक्तता जरी मिळाली असली तरी आज समाजात काही अनिष्ट चालीरीतींना बळी पडावे लागते एखाद्या स्त्रीचा पती आकस्मित निधन पावतो आणि तिच्यावर तिच्या कुटुंबाची मुलांची सासू-सासर्‍यांची जबाबदारी येऊन पडते तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.घरचा कर्ता गेल्यामुळेच तिच्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी येऊन ठेपते म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांचा मुलगा होऊन आधाराची काठी बनवावी लागते. त्यासाठी परिस्थितीशी झगडत कुटुंबाच्या पालकत्वाची जबाबदारी येऊन ठेपते तरीही भारतीय स्त्री यासारख्या संकटाला धीराने सामोरा जाते व आपल्या कुटुंबाचा भार पेलते.मात्र अनिष्ट रूढी परंपरा आणि काही सामाजिक विचारांचा खुजेपणा आडून स्त्रीचे अलंकार उतरविणे पायातील जोडवे काढणे, नवऱ्याच्या तिरडीवर आणून तिच्या बांगड्या फोडणे, कपाळावरचे कुंकू पुसणे ,ओटी उतरविणे अशा अघोरी व काळीज पिळवटणाऱ्या प्रथा व रुढीना स्त्रियांना बळी पडावे लागते या वेळी स्त्रीच्या मनावर होणारे आघात व तिच्या मानसिक स्थितीचा विचार केला जात नाही हे सर्व निंदनीय व निषेधार्ह असून स्त्री ही माता, भगिनी आणि अर्धांगिनी आहे. तिचा यथोचित सन्मान राखणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे .मंगल व धार्मिक समयी तिला अपमानास्पद वागणूक देणे व मानसिक खच्चीकरण करणारे किळसवाणे प्रकार जसे की डोकीवर कुंकू लावण्यास बंदी, फुले माळण्यास बंदी, हळदी कुंकू वाहण्यास बंदी, हातात हिरव्या बांगड्या घालण्यास बंदी, हिरव्या रंगाची साडी परीधान करण्यास बंदी, पायात जोडवी घालण्यास बंदी पैजण घालण्यास बंदी नाकात नथ घालण्यास बंदी, अशा विविध प्रकारच्या कालबाह्य झालेल्या रूढी, परंपरा व प्रथा ही स्त्रीच खच्चीकरण करणारी तिचे अस्तित्व नाकारणारी व तिला सन्मान न देणारी विधवा प्रथा यापुढे …… ग्रामपंचायत हद्दीत बंद करण्यात येत असून भविष्यात कोणालाही वैधव्य आल्यास तसेच या पूर्वीच्या सर्व विधवा माता-भगिनींना …… ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सर्व विधवा माता-भगिनींना सन्मानाची व समानतेची वागणूक देईल सर्व सामाजिक, मंगल, धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम व विधी मध्ये त्यांना प्राधान्याने रसन्मान दिला जाईल, नवऱ्याच्या निधनवेळी केल्या जाणाऱ्या कालबाह्य, अघोरीं व अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरेचे तीला बळी दिले जनर्व नाही असा ठराव एकमुखाने घेण्यात आला होता
सदर कार्यक्रम महालक्ष्मी हॉल पंचायत समिती कुडाळ च्या बाजूला दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत होणार आहे. सदर कार्यक्रमास माननीय आमदार वैभव नाईक , मा.श्रीम.के मंजू लक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग माननीय श्री प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माननीय श्री राजेंद्र दाभाडे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री राजेंद्र पराडकर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत
तरी या स्त्री सन्मानाच्या जागराचे सर्वांनी साक्षीदार होऊया असे आवाहन गटविकास अधिकारी विजय चव्हाण, यांनी केलेय. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी बाळकृष्ण परब, बाल विकास अधिकारी गीता पाटकर पै, गट शिक्षण आधीकरी संदेश किंजवडेकर, तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड, विस्तार अधिकारी रामचंद्र जंगले,संजय ओरोसकर मुख्य सेविका ललिता कासले,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page