सावंतवाडी /-

माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली प्रशालेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनंत परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सत्कार सोहळ्याचे आयोजन करता न आल्याने शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2020, मार्च 2021 व मार्च 2022 या तिन्ही शैक्षणिक वर्षांमधील प्रशालेतून प्रथम तीन गुणानुक्रमांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी निरवडे गावचे सरपंच हरी वारंग यांचा त्यांच्या विशेष कार्याबद्दल संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष अनंत परब, संस्था उपाध्यक्ष रामा जाधव, संस्था सचिव नागेश गावकर, सहसचिव गोविंद धडाम, बापू मोर्ये, सोनुर्ली सरपंच गुंजन हिराप, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी पालयेकर, उमेश सावंत, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विकास जेठे, प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एस. मोर्ये, एन. जे. गवंडळकर, पी. जी. काकतकर, पी. एम. सावंत, शशिकांत गवंडे, कृष्णा गावडे, महेश सावंत, विनोद ठाकूर, विष्णू नाईक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात कष्ट करून जिद्दीने ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाच बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा. करिअरच्या नवनवीन वाटा शोधा आणि सतत नाविन्याचा ध्यास घ्या.” असे आवाहन निरवडे गावचे सरपंच हरी वारंग यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page