कुडाळ /-
पाट हायस्कूलमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम माजी विद्यार्थी आणि संस्था एकत्रितपणे राबवीत असतात त्याचाच एक भाग म्हणून माजी विद्यार्थी श्री अशोक सारंग (सी .ए. )यांच्या हस्ते गेस्ट हाऊस समोर वृक्ष लागवड करण्यात आले तसेच माजी विद्यार्थी श्री संतोष चव्हाण नर्सरी व्यावसायिक यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .श्री संतोष चव्हाण आणि श्री राजन हंजनकर .पर्यवेक्षक यांच्या संकल्पनेतून विविध झाडांची लागवड पाट हायस्कूल परिसरात करण्यात आली आहे. त्यामध्ये सुपारीची 75 झाडे त्याचप्रमाणे फुलझाडे व इतर झाडांची लागवड करण्यात आली यावेळी संस्था पदाधिकारी श्री देवदत्त साळगावकर खजिनदार ,श्री अवधूत रेगे ,श्री दीपक पाटकर, श्री राजेश सामंत निवृत्त कर्मचारी श्री बाळा गोसावी त्याचप्रमाणे मुख्याध्यापक श्री शामराव कोरे पर्यवेक्षक श्री हंजनकर सर, श्री केरकर सर शिक्षक प्रतीनिधी, कलाशिक्षक श्री साळस्कर सर आणि अन्य शिक्षक, शिक्षीका यांच्या उपस्थितीत ही लागवड करण्यात आली याचवेळी वनविभागातर्फे आर एफ ओ श्री योगेश सातपुते, श्री सुनील सावंत वनपाल, श्री रोहित मायणिकर वनरक्षक ,श्री घाडीगावकर यांना सहाय्यक याने हे वृक्ष लागवड करून हा कृषी दिन साजरा केला यावेळी श्री योगेश सातपुते यांनी मुलांना वृक्षदिनाचे महत्त्व पटवून सांगितले महाराष्ट्र राज्यात असलेला वनविभाग बायोडायव्हर्सिटी याविषयीही सुंदर माहिती दिली पर्यवेक्षक श्रीहंजनकर सर यांनी वन दिनाचे महत्त्व पटवून सांगितले