You are currently viewing वाघाची हत्या कातडी तस्करीप्रकरणी संशयितांना जामीन मंजूर..

वाघाची हत्या कातडी तस्करीप्रकरणी संशयितांना जामीन मंजूर..

कणकवली /-

वाघाच्या कातड्याची बेकायदेशिर वाहतूक करणाऱ्या दोघांसह वाघाची अवैध हत्या केल्याप्रकरणी अन्य चारजणांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. व्ही. हांडे यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता केली.. आरोपींच्यावतीने अँइ.उमेश सावंत, कणकवली यांनी काम पाहिले.

दि. १४ मे २०२२ रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पडेल कॅन्टीन ते कासार्डे मार्गावरून जाणाऱ्या होंडा शाईन वाहनावरील सुभाष तावडे, रा. ओझरम व प्रकाश देवळेकर, रा. महाळुंगे ता. देवगड यांची झडती घेतली असता ८ लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे आढळले. या दोघांनाही अटक तपास केला असता या गुन्ह्यात राकेश नवले, वामन देवळेकर, जयसिंग नवले (सर्व रा. महाळुंगे) यांचा सहभाग स्पष्ट झाला व त्यांनी जंगलात लावलेल्या सापळ्यात सदरचा बिबट्या सापडल्यानंतर लोखंडी भाला व कोयत्याचे सहाय्याने त्याची हत्या करून त्याची १७ नखे तसेच इतर अवयव देखील हस्तगत करण्यात आले. आरोपी सदरचे कातडे विक्रीकरीता नेत असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोलीसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले होते. आरोपींविरूद्ध वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ४४, ४९ ब व ५१ अन्वये येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता.तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली होती. याबाबत आरोपींतर्फे जिल्हा सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला असता आरोपीची प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर तपासात ढवळाढवळ करू नये, दोषारोपपत्र दाखल करेपर्यंत पोलीस स्टेशनला हजेरी लावावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

अभिप्राय द्या..