गुवाहाटी /-

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमदारांचा समूह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झाला आहे. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.”आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी सुरत विमानतळावर सांगितलं होतं.

“मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. शिवसेना आमदारांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतलेली नाही. हिंदुत्व आणि आनंद दिघेनचे विचार यांचा राजकीय फायद्यासाठी वापर कधीही करणार नाही”, असं शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नेमके किती आमदार याविषयी सुरुवातीला स्पष्टता नव्हती. सुरत इथल्या हॉटेलमधला एक फोटो समोर आला होता. त्यातून आमदारांची मोठी फौज शिंदे यांच्याबरोबर असल्याचं स्पष्ट झालं.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार

1- प्रताप सरनाईक (माजिवडा, ठाणे)
2- श्रीनिवास वनगा (पालघर)
3- अनिल बाबर (खानापूर)
4- नितिन देशमुख (अकोला)
5-लता सोनवणे (चोपडा)
6- यामिनी जाधव (भायखळा)
7- संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)
8- महेंद्र दळवी (अलिबाग)
9- भारत गोगवले (महाड)
10.प्रकाश सर्वे (मागाठणे)
11.सुहास कांदे (नांदगाव)

  1. बच्चू कडू , प्रहार पार्टी (अचलपूर)
    13- नरेन्द्र बोंडेकर, अपक्ष (भंडारा)
    14- संजय गायकवाड (बुलडाणा)
    15- संजय रायमूलकर (मेहेकर)
    16-बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
    17- रमेश बोरनारे (वैजापूर)
    18- चिमणराव पाटील (एरंडोल)
    19- किशोर पाटील (पाचोरा)
    20-नितीनकुमार तळे (बाळापूर)
    21-संदीपान बुमरे (पैठण)
    22-महेंद्र थोरवे (कर्जत)
    23-शंभूराजे देसाई (पाटण)
    24- शहाजी पवार
    25- तानाजी सावंत (परांडा)
    26- शांताराम मोरे (भिवंडी)
    27-विश्वनाथ भोईर (कल्याण)
    28- शहाजी पाटील
    29-प्रदीप जैसवाल
    30-किशोर पाटील
    31-उदयसिंह राजपूत

सोमवारी संध्याकाळी मुंबईत सुरू झालेलं हे थरारनाट्य मंगळवारी सुरतमध्ये जाऊन पोहोचलं. सुरतमधल्या ली मेरेडियन हॉटेलात दिवसभर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत याचा अंदाज घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या वतीने मिलिंद नार्वेकर आणि फाटक यांना चर्चेसाठी सुरतला पाठवण्यात आलं. दरम्यान भाजपचे आमदार संजय कुटे हे याच हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. कुटे यांच्याबरोबरीने भाजप नेते मोहित कंबोज हेही या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांबरोबर असल्याचं दिसून आलं.

उद्धव आणि शिंदे यांच्यात 15-20 मिनिटं चर्चा झाल्याचं वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांचं मन वळवायला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवरून ही चर्चा झाली. तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की भाजपाबरोबर जायला हवं, यातच पक्षाचं हित आहे. तसंच मी सेना सोडली नाही, मी बाळासाहेबांचा सैनिक आहे असंही ते पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page