You are currently viewing योगा दिनानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन.

योगा दिनानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन.

कुडाळ /-

२१ जून- आंतरराष्ट्रीय योग दिन संत राऊळ महाराज महाविद्यालयात उत्साहात साजरा झाला. योग दिनानिमित्त महाविद्यायालयात प्रात: सत्रामध्ये योग प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे आयोजन हे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना या विभागांमार्फत करण्यात आले. या शिबिरात दोन्ही विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विविध योगा प्रकार तसेच प्राणायाम यांचे सादरीकरण केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. बी.झोडगे यांनी शरीर उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी योगा आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे समन्वयक लेफ्ट. डॉ.एस. टी. आवटे यांनी तर आभार प्रदर्शन
राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. यू.एम. कामत यांनी केले. सदर योग शिबिरास महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..