You are currently viewing मालवणमध्ये मद्यधुंद ग्राहकांकडून बार मालकालाच मारहाण..

मालवणमध्ये मद्यधुंद ग्राहकांकडून बार मालकालाच मारहाण..

मालवण /-

मालवण शहरातील वायरी येथील एम पी रेस्टो वाईन या बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत आतील साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच बार मालकास शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी वायरीतील दोघांविरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची तक्रार शेखर गजानन गाड यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. काल रात्री तेजस हनुमंत देऊलकर व बोडये (पूर्ण नाव माहित नाही हे दोघे वायरी येथील एम पी रेस्टो वाईन या बारमध्ये मद्य पिण्यासाठी गेले होते. यात दोघेही मद्य पिऊन मोठमोठ्याने बोलत शिवीगाळ करत होते. त्यामुळे बारमधील कामगाराने त्यांना शांत राहण्यास सांगितले असता त्यांनी काचेचे ग्लास, बॉटल, खुर्ची तोडून नुकसान केले. यात गाड हे त्यांना थांबविण्यास गेले असता तेजस याने गाड यांच्या छातीवर ठोशाने मारून दुखापत केली. याप्रकरणी गाड यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर अधिक तपास करत आहेत.

अभिप्राय द्या..