You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हाउपाध्यक्ष अनंत पिळणकर,प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,चिटणीस रुपेश जाधव यांच्या माध्यमातून झाडे वाटप..

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हाउपाध्यक्ष अनंत पिळणकर,प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,चिटणीस रुपेश जाधव यांच्या माध्यमातून झाडे वाटप..

कणकवली /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन कुर्ली येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिंपळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत 500 झाडांचे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, विनोद मर्गज, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, मालवणचे माजी सभापती नाथा मालंडकर, लोरे माजी सरपंच च. वा. राणे, विधानसभा मतदार संघ युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस सागर वारंग, कणकवली शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर, इरफान शेख, निखिल गोवेकर, सखाराम हुंबे, उत्तम तेली, सेनापती सावंत, राजू मेस्त्री, सुजल शेलार, सर्वेश पावस्कर, शंकर चिंदरकर, चंद्रकांत नाईक, संतोष चव्हाण, कृष्णा निकम, स्नेहा सावंत, शांताराम परके, बाबा सुतार, संतोष तेली, प्रमोद चव्हाण, जयेश चव्हाण, प्रवीण पार्टे, संतोष हुंबे, महेश कदम, रत्नाकर प्रभू, बाबू सावंत, रुपेश हुंबे, पुरुषोत्तम हुंबे, रूपा होळकर, सरिता निकम, मीना पाडावे, हिराबाई निकम, सुनीता राणे, सागर होळकर, सुरेश निकम आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनंत पिळणकर म्हणाले की, जिल्ह्यात अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार वाटचाल सुरू आहे. त्यांच्या आजच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा संपुर्ण आठवडा आम्ही कार्यकर्ते विविध उपक्रमांनी साजरा करणार आहोत. जिल्ह्यात पक्ष आणखीन जोमाने वाढवा आणि आगामी निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळविण्यासाठी आम्ही अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

अभिप्राय द्या..