सिंधुदुर्गनगरी /-

मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य श्री. राजन चव्हाण यांचे चिरंजीव तेजस चव्हाण यांचे आज सकाळी निधन झाले. ते 32 वर्षांचे होते.

श्री. तेजस चव्हाण हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. आज सकाळी 10.00 वाजता कामावर रुजू झाल्यानंतर ते प्रसाधनगृहात गेले असता चक्कर येऊन कोसळले. त्यांचे डोके नळावर आपटल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. प्रसाधनगृहाचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.

कै. तेजस चव्हाण यांच्या मागे पत्नी, आई-वडील, बंधू-वहिनी असा मोठा परिवार आहे.मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी श्री. राजन चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page