मुंबई/-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या दहावी परीक्षेच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.यात पुन्हा सावीत्रीच्या लेकींनी बाजी मारली आले. राज्याच्या एकुण निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल९६.०६ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग पुन्हा अव्वल ठरला असून त्या पाठोपाठ कोल्हापूर विभागाने दुसरा क्रमांक मिळवला आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.

सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९९.२७ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक ९५.९० टक्के विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २०२०च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

विभागनिहाय टक्केवारी

कोकण विभाग – ९९.२७टक्के

कोल्हापूर विभाग – ९८.५०टक्के

पुणे विभाग – ९६.९६टक्के

नागपूर विभाग -९७ टक्के

औरंगाबाद विभाग – ९६.३३टक्के

मुंबई विभाग – ९६.९४टक्के

अमरावती विभाग -९६.८१ टक्के

नाशिक विभाग – ९५.९०टक्के

लातूर विभाग – ९७.२७टक्के

राज्यात 22 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवलेले आहेत.

निकालासंदर्भात बोर्डाची पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात यासंदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आलीये. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकण विभाग अव्वल आहे! कोविडमुळे विद्यार्थी आणि पालक दोन्हींचे हाल झाले. परीक्षा होणार नाही होणार इथून सुरुवात होती पण तरीही राज्यातल्या एकूण 22 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवणं ही अभिमानास्पद बाब आहे. शिवाय 82 हजार 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण मिळालेले आहेत.

12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के

यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागलेला आहे.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के लागेलेला आहे. कोविडमुळे 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. यूपीएससी, बारावी आणि आता दहावी! दहावीच्या परीक्षेत सुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे. राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागलाय. त्याचबरोबर राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून 8 हजार 169 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 8 हजार 29 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 7 हजार 579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page