You are currently viewing सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्था, संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत पुरस्कार जाहीर..

सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्था, संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत पुरस्कार जाहीर..

सिंधुुदुर्ग /-

सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संस्था पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्साहाने काम करण्यासाठी तसेच त्यांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची / प्रोत्साहनाची थाप मिळणे आवश्यक असते. त्यासाठी सहकारी संस्था, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांच्यासाठी जिल्हा बँक सन २०१६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकारात चांगले काम केलेल्या व्यक्तिच्या नावे पुरस्कार देत आहे. त्यानुसार सन २०२२ या वर्षाचे पुरस्कार वितरण बँकच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केले जाणार आहेत. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रशस्ती प्रमाणपत्र असे असून हे पुरस्कार खालील व्यक्तींच्या नावे देण्यात येतात.

कै. शिवराम भाऊ जाधव स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार, कै. केशवरावजी राणे स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार, कै. डी. बी. ढोलम स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी पुरस्कार, कै. भाईसाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ कृषीमित्र पुरस्कार.

या पुरस्कारासाठीचे अर्ज तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकास अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध असून सहकारी संस्था, संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांनी बँकेच्या वरील कार्यालयाशी त्वरेने संपर्क साधून आपले प्रस्ताव बँकेकडे दि. ८ जुलै, २०२२ पर्यंत सादर करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष प्र. दळवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

अभिप्राय द्या..