You are currently viewing उद्या बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या जनऔषधी केंद्राचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या शुभहस्ते उद्घाटन.

उद्या बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या जनऔषधी केंद्राचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या शुभहस्ते उद्घाटन.

कुडाळ /-

उद्या दिनांक १३/०६/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता एमआयडीसी कुडाळ येथे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग च्या वतीने सुरु करण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी परियोजना अंतर्गत जन औषधी केंद्राचे उद्घाटन पर्यटन व बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार मान.नाम.श्री. श्रीपाद नाईक यांच्या शुभ हस्ते तसेच आमदार श्री. वैभव नाईक व माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थित होणार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसादात देत जनसामान्यांना वाजवी किंमतीत नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात जन औषधी मेडिकल स्टोअर्स सुरू करून एक वेगळा आदर्श निर्माण करणारीकुडाळ येथील बॅ नाथ पै शिक्षण संस्था एकमेव म्हणावी लागेल. यासाठी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या विषेश प्रयत्नातून या जनऔषधी स्टोअर्स चे उद्घाटन केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते होणार आहे. या जन औषधी मेडिकल स्टोअर्स चा जनसामान्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..