You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील हत्तीप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न..

दोडामार्ग तालुक्यातील हत्तीप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न..

मुंबई /-

दोडामार्ग तालुक्यातील केर, मोर्ले, हेवाळे या व इतर गावात मागच्या 22 वर्षांपासून असलेल्या हत्तींच्या उपद्रवाच्या गंभीर प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे यांनी यापूर्वीच दखल घेतली होती.त्यानुसार मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य वन संरक्षक श्री.सुनील लिमये यांना सदरहू समस्येची पाहणी करण्याकरिता दोडामार्ग येथे पाठविले होते.त्याअनुषंगाने आज दि.06.06.2022 रोजी मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांची बैठक बोलाविली होती.दोडामार्गातील वनहत्तींच्या समस्येवर यावेळी बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग मधील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या परिसरात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आजरा, चंदगड, तिलारी या परिसरातील हत्तींचा प्रवेश बंद करण्याबाबत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा झाली.

सदरहू बैठकीला पर्यावरण मंत्री मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे, रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायकजी राऊत व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी , प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव )पश्चिम , मुंबई, क्लेमेंट बेन ,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक मल्लिकार्जुन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर,वाय एल पी राव आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..