कुडाळ /-

“सार्वभौम लोकशाही राज्याची संकल्पना रुजविणारे रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो. असे म्हणून राज्य करणारे लोकांच्या हृदयातले राजे .लोकशाही सार्वभौम राज्याची संकल्पना प्रथम रुजविणारे, रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज” असे उद्गार प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्धापण कार्यक्रमात ते बोलत होते. हे त्यानी आपल्या पुढील मनोगतामध्ये” शिवाजीराजांनी दूरदृष्टीने विचार करून लोक कल्याणकारी राज्य अधिकृतरीत्या अस्तित्वात येण्यासाठी ६जून १६७४ मध्ये रायगडावर विधिवत राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि ते खऱ्या अर्थाने राजे बनले. रयतेचे राजे बनले.या सुवर्णक्षणांची आठवण करण्यासाठी, लोकराज्य कसे असावे? त्याची संकल्पना जनसामान्यात रुजविण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. आणि हा क्षण आज सर्वांसाठी ,सर्व राज्यकर्त्यांसाठी एक संदेश असावा. असं मत त्यांनी व्यक्त केले .त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये शिवाजी महाराजांचे लोकोत्तर कार्य व त्यासाठी असलेल्या समान न्याय आणि मॅनेजमेंट गुरू असलेल्या त्यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचा उपस्थितांना परिचय करून दिला व त्याने जे काही अष्ट प्रधानमंडळ निर्माण केलं ते आजही आपल्याला आदर्शवत आहे आणि राज्यकारभार कसा पारदर्शक असावा हे आपल्या राज्यकारभाराच्या उदाहरणातून लोकांसमोर ठेवलं.असा महान राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला याबद्दल आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य कारभार चालवण्याचं धोरण आज अंगीकारण्याच्या गरजेचे प्रतिपादन केले . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अध्यक्षस्थानावरून बोलताना मीना जोशी यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांनी जी राज्यकारभार करण्यासंदर्भात घालून दिलेली मूल्य, नीतिमूल्ये याचा विसर होऊ न देता आजच्या राज्यकर्त्यांनी राज्यकारभार केला तर ती खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल .असे सांगत आपण शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सुखद स्मृती निमित्ताने स्वराज्याचे शिवाजी महाराजांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवूया .असे सांगून शुभेच्छा दिल्या . यावेळी व्यासपीठावर नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी, महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे ,फिजिओ थेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरज शुक्ला, इत्यादी उपस्थित कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा अरुण मर्गज यांनी केले. यावेळी विविध अभ्यासक्रमाची प्राध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page