You are currently viewing वेंगुर्ले शहरात २७ मे पासून २ दिवस आड होणार पाणीपुरवठा

वेंगुर्ले शहरात २७ मे पासून २ दिवस आड होणार पाणीपुरवठा

वेंगुर्ला /-

     

वेंगुर्ले नगरपरिषद क्षेत्रातील शहरातील नळ कनेक्शन धारकांना होणारा पाणीपुरवठा २७ मे पासून २ दिवस आड करण्यात येणार आहे,असे न.प.च्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. सध्या तलावातील अस्तित्वातील साठा, हवामान, सध्याचे तापमान व लोकांची पाण्याची वाढती मागणीचा विचार करता दि.२७ मे पासून पाणीपुरवठा २ दिवस आड करण्यात येणार आहे. सर्व नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचा जपून व योग्य प्रकारे वापर करावा व न.प.ला सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. सदरचा पाणीपुरवठा शनिवार २८ मे ऐवजी सोमवार ३० मे रोजी करण्यात येईल व नंतर २ दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येईल, असे न.प.च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..