You are currently viewing शिवसेना नेते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी ईडीने धाड..

शिवसेना नेते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी ईडीने धाड..

मुंबई /-

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी आज सकाळी साडेसहा वाजता ईडीने धाड टाकली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार परब यांच्याशी संबधीत मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे.

ही कारवाई अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. वृत्तानुसार, आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. ईडीने परब यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचेही वृत्त आहे. परब यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे.

अभिप्राय द्या..