You are currently viewing गोवा- दोडामार्ग ते कोल्हापूर -बेळगाव मार्गावर कंटेनरला धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने आपघात दुर्घटना टळली..

गोवा- दोडामार्ग ते कोल्हापूर -बेळगाव मार्गावर कंटेनरला धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने आपघात दुर्घटना टळली..

दोडामार्ग /-

गोवा ते दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मार्गावर बुधवारी रात्री हरियांना येथून माल भरून गोवा येथे जाणाऱ्या मालवाहु कंटेनर याला तिलारी घाटातील धोकादायक उतार याचा अंदाज नसल्याने घाटातील अपघात ग्रस्त ठिकाण असलेल्या जय पॉईंट येथे हा कंन्टेनर कठडा याला धडकून दरीत कोसळता कोसळता वाचला.या घाटातून अवजड वाहनाना बंदी असतांना परराज्यातील वाहने गोवा जवळ आहे.शिवाय आंबोली घाट अवजड वाहनाना बंदी आहे.तरी येथून येतात.तिलारी घाटातील जय पॉईंट येथील चड उतार यु आकाराचे वळण धोकादायदाय आहे. संपूर्ण उतार असून दरीच्या तोंडावर टन मारावा लागतो हे अनोळखी वाहन धारकांच्या लक्षात येत नाही आणि अशा प्रकारे अपघात होतात या ठिकाणी गेल्या काही वर्षात एस टी बस खाजगी वाहनाना अपघात झाला आहे. काही जणांचा अपघातात बळी देखील गेला आहे.

अभिप्राय द्या..