सावंतवाडी /-
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक सिंधुदुर्ग यांच्या वतीने किमान कौशल्य विकास जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मार्फत एस एस आय कॉम्प्युटर सावंतवाडी येथील स्ट्रीट फूड वेंडोर हा कोर्स यशस्वी रित्या पूर्ण करून स्वयंरोजगार सुरू केलेल्या यशस्वी विद्यार्थ्या मार्फत बनविण्यात आलेल्या बेकरी उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री आज दिनांक २५ मे रोजी सकाळी १०:३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. व्ही बी नाईक सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.यावेळी इन्स्टिट्युटचे संचालक श्री. तानावडे, चिन्मयी केळबाईकर, प्रतिक्षा कांबळे, नामदेव सावंत, व इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी, नगरपालिका कर्मचारी डयुमिनी अल्मेडा, एकनाथ पाटील उपस्थित होते.