कणकवली /-

नांदगाव तिठा येथील सव्र्हस रोडसाठी नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी सुरू असलेले उपोषण स्थगित केले आहे. सव्र्हींस रोड खुला करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने तेथील बाधित जमीन मालक नलावडे यांना आजच लेखी पत्र देत आहोत. तसेच त्यांच्या जमिनीच्या वाढीव मोबदल्याचाही प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणकडे पाठविला असल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. यानंतर उपोषण मागे घेत असल्याचे नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांतून सांगण्यात आले.

नांदगांव पंचक्रोशीतील माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, सामजिक कार्यकर्ते भाई मोरजकर, असलदे सरपंच पंढरी वायगंणकर, ओटव उपसरपंच राजेश तांबे, विश्वनाथ जाधव, मारुती मोर्ये, नितेश म्हसकर, आशिये माजी सरपंच

शंकर गुरव, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायगंणकर, पत्रकार भगवान लोके, माजी सरपंच संजय पाटील, हनुमंत वाळके, कमलेश पाटील, संतोष पुजारे, आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. तसेच या उपोषणाला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, सरचिटणीस प्रवीण वरुनकर, भाजप तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व सर्व्हिस रस्त्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने पत्रकारांनी या साखळी उपोषणाला पाठींबा दर्शवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page