You are currently viewing आंबोली घाटात ट्रक- मोटरसायकल अपघातात ट्रकखाली चिरडून वेताळ-बांबर्डे येथील समीर जाधव ठार..

आंबोली घाटात ट्रक- मोटरसायकल अपघातात ट्रकखाली चिरडून वेताळ-बांबर्डे येथील समीर जाधव ठार..

आंबोली /-

ओव्हरटेक करताना समोरच्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली मिळाल्याने जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला असून त्याला मानसिक धक्का बसला आहे. हा अपघात रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली नाना पाणी वळणावर घडला.समीर शशिकांत जाधव रा. वेताळ-बांबर्डे ता. कुडाळ असे त्याचे नाव आहे. याबाबत मुबारक हुसेन शेख वय ४२ रा चंदगड या चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार आंबोली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, शेख हे आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास कोल्हालापूरच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून भरधाव आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या जाधव यांच्या गाडीचा ताबा सुटला, आणि ते थेट ट्रकच्या खाली आले. यात त्यांच्या अंगावरून चाक गेले असू चिरडले आहेत. यात त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई व सहका-यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत सहकार्य केले. तर जखमी असलेल्या सहकाऱ्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविले. समोर अपघात दिसल्याने त्याला मानसिक धक्का बसला आहे.

अभिप्राय द्या..