सावंतवाडी /-

लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी कणकवलीतील “त्या” शिक्षिकाची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अमित दिलीप ठाकूर (रा. ठाकुरवाडी – आशिये), असे त्याचे नाव आहे. त्याला काल सकाळी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडीत देण्यात आली होती. दरम्यान आज त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. याकामी अॅड. संग्राम देसाई व अॅड. पंकज आपटे यांनी काम पाहिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, लग्नाचे आमिष दाखवून संबंधित शिक्षकाने आपल्यावर अत्याचार केला. तसेच आपले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले, अशी तक्रार त्याच्या सहकारी शिक्षिकेने केली होती. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठाकूर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्याला काल सकाळी अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज सायंकाळी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page