You are currently viewing वेंगुर्ले मध्ये घडलेल्या कॅनिंग आंबा चोरीच्या संशयावरून तीन जणांना १९ मे पर्यत २ दिवसांची पोलिस कोठडी..

वेंगुर्ले मध्ये घडलेल्या कॅनिंग आंबा चोरीच्या संशयावरून तीन जणांना १९ मे पर्यत २ दिवसांची पोलिस कोठडी..

नग्न करून अमानुष पणे मारहाण करून त्यांचा विडिओ व्हायरल प्रकरण…

ओरोस /-

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-वरचेमाडवाडी येथे आंबा चोरीच्या रागातून वेंगुर्लेतील तिघांना जातिवाचक शिवीगाळ करून नग्न करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहाही संशयितांना आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या गौतम वेंगुर्लेकर याने तक्रार दिल्या नंतर वेंगुर्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिलेल्या तक्रारी मध्ये त्याने संशयित म्हणून प्रसाद मांजरेकर,प्रतिक धावडे, रावशा शेलार,गौरव मराठे, नयन केरकर,दिनेश गवळी, योगी सरमळकर यांच्यासह दहा ते बारा जणांचा समावेश आहे, असे म्हटले होते. मारहाण करणाऱ्यांनी त्यांच्या गाड्यांचेही नुकसान केले आहे. जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणे, गाड्यांची नुकसानी तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील नयन केरकर याला रविवारी रात्री अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची म्हणजेच बुधवार पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर सहा संशयित आरोपींना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना आज मंगळवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे करीत आहेत.

अभिप्राय द्या..