You are currently viewing झाराप-माणगाव रस्त्यातील खड्डे तात्काळ बुजवा ; आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तर्फे उप अभियंता कुडाळ यांना निवेदन

झाराप-माणगाव रस्त्यातील खड्डे तात्काळ बुजवा ; आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तर्फे उप अभियंता कुडाळ यांना निवेदन

येत्या आठवड्याभरात दखल न घेतल्यास पावसाळ्यात रस्ताच उखडून टाकण्याचा इशारा..

कुडाळ /-

तालुक्यातील झाराप ते माणगाव मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून सदर मार्गात अपघात होत आहेत. येत्या आठवड्याभरात सदर रस्त्यातील खड्डे बुजवण्यात यावेत अन्यथा ते पावसाळ्यात उखडून टाकण्यात येतील, अशा इशारा जिल्हा परिषद उप अभियंता कुडाळ यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आज देण्यात आले आहे.

बांधकाम विभागातील इंजिनियर यांच्याशी अनेक वेळा संपर्क केला असता झाराप-माणगाव रस्ता खडीकरण-डांबरीकरणासाठी मंजूर झाला असून हे काम त्वरित सुरू करण्यात येत आहे, अशा प्रकारची आश्वासने मिळतात.मे महिना संपत आला असून पावसाळा तोंडावर आला असताना आपणही आश्वासने देणे गैर आहे. सदर रस्ता माणगाव खोऱ्याला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. हे आपणास ज्ञात असता ह्या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेला आपले खाते जबाबदार आहे. सदर रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. या पत्राद्वारे माणगाव वासियांतर्फे आपणास ही सुचना देण्यात येत आहे की, येत्या आठ दिवसात सदर रस्त्याचे खड्डे व्यवस्थित बुजवले न गेल्यास भर पावसात हा रस्ता आम्ही उखडून टाकू, याला सर्वसी आपले खाते पूर्ण जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. असे उप अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद धुरी यांनी नमूद केले आहे.

अभिप्राय द्या..