You are currently viewing आमदार वैभव नाईक यांच्यात धमक असेल तर स्व:खर्चातून पर्यटन महोत्सव आयोजित करावा.;माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची टीका.

आमदार वैभव नाईक यांच्यात धमक असेल तर स्व:खर्चातून पर्यटन महोत्सव आयोजित करावा.;माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची टीका.

मालवण /-

मालवण नगरपालिकेत गेल्या पाच वर्षात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरात विकास कामांचे तीन तेरा वाजवले. आमदार वैभव नाईक गेल्या आठ वर्षात आमदारकीच्या काळात स्व:खर्चातून महोत्सव सोडा साधा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ शकले नाहीत. मात्र आता नगरपरिषद प्रशासनाच्या खांद्यावर हात ठेवून पर्यटन महोत्सव आयोजित करत आहेत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पर्यटन महोत्सवातून जनतेच्या पैशाची लूट करण्याचा डाव शिवसेना लोकप्रतिनिधींनी मांडला आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि कुटुंबीय स्व:खर्चातून दणक्यात महोत्सव साजरे करायचे, तशी धमक शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी धमक असेल तर स्व:खर्चातून महोत्सव आयोजित करावा असे आव्हान माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिले आहे.माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी मालवण भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन टीका केली.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, विलास मुणगेकर, ललित चव्हाण, बाळा मालवणकर, आदी उपस्थित होते. यावेळी आचरेकर म्हणाले, गेल्या पाच वर्षात मालवण शहरात सत्ताधारी शिवसेनेने बिल्डर्सना अभय देऊन उंच टॉवर देण्याची कामे केली. बिल्डर्स बरोबर चर्चा करण्यास शिवसेना लोकप्रतिनिधींनीना वेळ होता. मात्र विविध समस्यांनी होरपळणाऱ्या जनतेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. गेल्या पाच वर्षात बाजारपेठेतील रस्ता करता आला नाही. व्यापाऱ्यांनी आक्रमक होऊन इशारा द्यावा. शिवसेनेचे राज्यकर्ते, नगराध्यक्ष आणि तेंच्या चेल्यांच्या…

अभिप्राय द्या..