You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मानाचा ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्कार जाहीर २२ जून रोजी लोणावळा येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा..

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मानाचा ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्कार जाहीर २२ जून रोजी लोणावळा येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा..

गतिमान आणि दर्जेदार बँकिंग सेवा देण्यासाठी जिल्हा बँक कार्यशील.; मनीष दळवी.

सिंधुदुर्ग /-

‘आपली माणसं आपली बँक’ हे ब्रीदवाक्य घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्यातील ग्राहकांच्या बँकिंग सेवेसाठी प्रगतीचे पाऊल पुढे टाकत आहे. या जिल्हा बँकेला बँको ब्लू रिबन २०२१ हा पुरस्कार मिळाला असून या यशाचे श्रेय जिल्हा बँकेचे सर्व संचालक अधिकारी आणि कर्मचारी यांना जाते. पुढच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार बँकिंग सेवा अधिक जलद व अधिक सजग देता येईल या दृष्टीने निश्चित प्रयत्न करेल, असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

या जिल्हा बँकेत आर्थिक मापदंडाचे उत्कृष्ट पालन झाल्याने या जिल्हा बँकेला बँको ब्लू रिबन २०२१ चा पुरस्कार जाहीर झाला आहे. लोणावळा येथे २२ जून रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. जिल्हा बँकेने अनेक उपक्रमात व आर्थिक मापदंडात चांगले काम केले असून यावर्षीही हे सातत्य ठेवले आहे. बँकिंग क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, अद्ययावत बँकिंग प्रणाली तसेच सहकार क्षेत्रातील विविध नियम आणि निकषांचे पालन करून सिंड्रोम जिल्हा बँकेने जिल्ह्यातील बँकिंग ग्राहकांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण केले आहे व बँकिंग क्षेत्राचा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात शेतकरी व शेवटच्या वर्गापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या काळातही हे क्षेत्र आणखी व्यापक करून बँकिंग क्षेत्र जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला आणखी पूरक ठरण्यासाठी बँक व्यवस्थापन आणि सर्व संचालक त्याला कटिबद्ध राहू, अशी ग्वाहीही या निमित्ताने बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली.

जिल्ह्यातील नागरिक शेतकरी मच्छीमार व्यावसायिक उद्योजक यांना उभारी देण्यासाठी जिल्हा बँकेने नवनवीन योजना हाती घेतल्या आहेत. सहकार विभागाच्या नियम व कायद्यांच्या चौकटीत राहून जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा बँक या जिल्ह्यांत विकासाच्या दृष्टीने चांगले काम करेल, अशी प्रतिक्रियाही मनिष दळवी यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा