You are currently viewing आपला भारत देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर चालतो.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

आपला भारत देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर चालतो.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

कुडाळ /-

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काबाड कष्टातून आपले शिक्षण पूर्ण केले त्या काळी शिक्षण घेणे सुद्धा कठीण होते पण आपल्या मनगटाच्या ताकदीवर आणि बुद्धिमत्तेची जोरावर त्यांनी कर्तुत्व निर्माण केले आपला देश त्यांच्या घटनेवर चालतो त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत असे आवाहन केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आयोजित केलेल्या संवाद चर्चामध्ये केले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील समस्यांचा आढावा त्यांनी घेऊन त्याबाबत लवकरच निर्णय घेतले जातील असेही त्यांनी सांगितले.

कुडाळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरिकांची संवाद साधण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला त्यानंतर समाज मंदिर येथे नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यामध्ये नागरिकांनी देवस्थान जमनी संदर्भात विषय मांडला यामध्ये त्यांनी सांगितले की देवस्थान इनाम असल्यामुळे कोणत्याही विकासकामांना शासन परवानगी देत नाही तसेच गरमध्ये येणार्‍या पावसाळी पुरामध्ये मेघरे बाधित होतात त्यामुळे व हाडाचा गाळ काढणे आणि संरक्षण भिंत बांधण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले तसेच व्यवसायाभिमुख प्रश्न सुद्धा नागरिकांनी मांडले

त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की जात पात आम्ही मानत नाही माणुसकी हा धर्म मानतो असे सांगून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. एकमेकांमध्ये भांडण न करता एकत्र राहणे हे कधीही समाजासाठी चांगलं असतं असे सांगून व्यवसाय सुरू करा आणि प्रगती करा प्रगती केल्यावर कोणीही आर्थिक मागास राहणार नाही. असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वावलंबी भारत आपल्याला बनवायचं आहे असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकांच्या वतीने जय भीम मंडळाचे माजी अध्यक्ष विजय जाधव व मंडळाचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण कुडाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच चित्रकार रजनीकांत कदम यांनी वालावल येथील लक्ष्मी नारायण मंदिराचे चित्र भेट म्हणुन दिले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, ओबीसी महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर, माजी नगरसेविका सरोज जाधव, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, शहराध्यक्ष राकेश कांदे, भाजपा गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, सखू आकेरकर, विशाखा कुलकर्णी, नगरसेवक अभिषेक गावडे निलेश परब, एड. राजीव कुडाळकर, बंड्या सावंत, अविनाश परडकर आदी उपस्थित होते. या संवाद चर्चाचे निवेदन माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा