कुडाळ /-

माणसाचे चारित्र्य ही त्याची खरी संपत्ती आहे.प्रा.अरुण मर्गज “माणसाचे चारित्र्य हीच त्याची खरी संपत्ती आहे.इतरांसाठी आपलं जीवन आदर्शवत असणं हे चारित्र्यसंपन्नतेचे गमक आहे .आपलं जीवन हे तरुणांसाठी संदेश असला पाहिजे. तर त्या जगण्याला समाजाच्या दृष्टीने अर्थ आहे .”असे उद्गार प्रा.अरुण मर्गज यांनी काढले ते बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांसाठीच्या फ्रेशर्स पार्टीचे आयोजन या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यानी आपल्या पुढील मनोगतामध्ये “दुसर्‍याचे दुःख दूर करणे हा जगातील सर्व समाधान,’आंनंदापेक्षा जास्त आनंद देणारा क्षण असतो .सुखदुःख हे वस्तूमध्ये न शोधता माणसात शोधा. दुसऱ्यांच्या द्वेष-छळातून मिळालेला पैसा आपल्याला कधीच समाधान व आनंद देऊ शकत नाही. आणि सेवे सारखा दुसरा धर्म नाही. सुदैवाने मानवी सेवेमध्ये कार्यरत होण्याचा राजमार्ग नर्सिंग ज्ञान प्राप्त केलेल्या प्रशिक्षणातून जातो. या महान मानव सेवेचा लाभ घ्या. इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत असताना स्वतः आनंदी ठेवा आणि रंजल्या-गांजल्या रुग्णांची सेवा परमेश्वराला अर्पण करा. यातच खरी परमेश्वर पूजा आहे.” असे उद्गार काढत , पाश्च्याती करण यांच्या आहारी न जाता इतरांसाठी जगणं आजच्या काळात किती आनंद देणार आहे . यांचे प्रतिपादन केले आणि सुखदुःख चे मनोगत व्यक्त करण्यासाठी आई-वडिलां सारख्या दुसऱ्या विश्वासू व निरिश्च प्रेम करणाऱ्या व्यक्ती असू शकत नाही. त्यांच्याकडे व्यक्त व्हा. बोलण्यातून समस्या दूर होतात. समस्येतून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या हा मार्ग होऊच शकत नाही .जीवन हे सुंदर आहे .जग हे सुंदर आहे म्हणूनच या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. इतरांना प्रेम द्यावे, द्वेषाचा मार्ग विभाजनातून जातो इतरांचा द्वेष करत राहिलात तर त्यांच्यावर प्रेम कधी करणार. म्हणून अहंकार, मानापमानाच्या गोष्टी बाजूला ठेवून नर्सिंग पेशा मार्फत समाजसेवेचे व्रत स्वीकारलेला आहे त्याचा खऱ्या अर्थाने आनंदी जीवनासाठी , जीवनांदासाठी उपयोग करा .असे सांगत नर्सिंग अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवीनतम सहकाऱ्यांचे सहृदयता पूर्वक स्वागत करण्याच्या या परंपरेचे कौतुक करून त्यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर नरसिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरज शुक्ला इत्यादी उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलन करुन सुरुवात झालेल्या या कार्यक्रमांमध्ये प्राचार्या मीना जोशी यांनी “आनंद पैशांमध्ये न शोधता तो माणसांमध्ये शोधा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घ्यावा. प्रलोभने टाळा. असे सांगत आपण या प्रशिक्षणाचा उपयोग समाजसेवेसाठी करावा. असा संदेश देत शुभेच्छा दिल्या. डॉ सुरज शुक्ला यांनी चॉईस, चान्सेस चेंजेस या गोष्टी जीवनामध्ये किती महत्त्वाच्या आहेत हे सांगत त्याचा योग्य व जाणकारपणे उपयोग केल्यास आपल्याबरोबर इतरांचे जीवन सुद्धा आपण आनंदी करू शकतो. असे सांगत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जुन्या विद्यार्थ्यांनी विविध गेम्स, स्पर्धा, गायन, अभिनय अशा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्कृती पूजक पोशाख करून सर्वांनी या फ्रेशर्स पार्टी चा मनसोक्त आनंद घेतला. या आयोजनासाठी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी,प्रा. वैशाली ओटवणेकर ,प्रा.प्रथमेश हरमलकर, प्रसाद कानडे व यांच्या च्या सहकार्याने ,चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page