You are currently viewing कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा वर्धापन दिन होणार १ मे राेजी.

कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा वर्धापन दिन होणार १ मे राेजी.

कणकवली /-

कलमठ गावडेवाडीचे श्रद्धास्थान श्री देव लिंगेश्वर मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा दिनांक 1 मे रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 9:30 ते 11.30 सत्यनारायणाची महापूजा, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद,दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. लहान मुलांचे फनिगेम्स, त्यानंतर सायंकाळी 6 वा. निमंत्रित भजने, रात्री 7 ते 9 वा. श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक मंडळ,असरोंडी (ता. मालवण) यांचे दिंडी नृत्य भजन होणार आहे.रात्री 9.30 वाजता शेखर शेणई प्रस्तुत ओमकार दशावतारी नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा महान पौराणिक “कलाक्षणी” महिमा हा नाट्य प्रयोग होणार आहे.भाविक भक्तांनी तीर्थप्रसाद, महाप्रसाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लिंगेश्वर मित्र मंडळ व ग्रामस्थ कलमठ गावडेवाडी यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..