You are currently viewing खासदार नवनीत राणा यांचा अर्धनग्न फोटो शोषल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी सुजित जाधव नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा कणकवली भाजपच्या महिला मोर्चाची मागणी..

खासदार नवनीत राणा यांचा अर्धनग्न फोटो शोषल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी सुजित जाधव नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा कणकवली भाजपच्या महिला मोर्चाची मागणी..

कणकवली /-

शोषल मीडियावर व्हायरल ग्रुपवर कणकवली गांगोवाडी येथील सुजित जाधव यांनी महिला खासदार नवनीत राणा यांचा अर्धनग्न स्थितीतील फोटो टाकला आहे. ही बाब त्या व्हाट्सअप ग्रुप मधील महिलांच्या मनात लज्जा निर्माण करणारी आहे. त्यामुळे सुजित जाधव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा कणकवली तालुका महिला मोर्चाच्या वतीने कणकवली पोलिस निरीक्षक यांच्याकडे आज करण्यात आली. तसेच त्‍याबाबतचे निवेदनही देण्यात आले.

भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, नगरसेविका मेघा गांगण, भाजपा महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, विनिता बुचडे आदींनी पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांना निवेदन दिले. यावेळी श्री.हुलावले यांनी यासंदर्भात चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती या शिष्टमंडळा कडून देण्यात आली.

दरम्‍यान भाजप महिला आघाडीतर्फे दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले की, सुजित जाधव यानी खासदार नवनीत राणा यांचा अर्धनग्न फोटो काल रात्री ११.१४ मिनिटानी एका ग्रुपवर टाकला. त्यामुळे ग्रुप वरील महिला सदस्याच्या मनात लज्जा निर्माण झाली आहे. तरी अशी विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचण्यासाठी आपण सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. सुजित जाधव यांच्यावर तत्काळ कारवाई न झाल्यास भाजपा महिला मोर्चा कणकवली कडून उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा