You are currently viewing भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे देवगड जामसंडे शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी पोलिसांना निवेदन..

भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे देवगड जामसंडे शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी पोलिसांना निवेदन..

देवगड /-

शहरातील अवैध धंदा बंद करण्याबाबत देवगड जामसंडे भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना निवेदन देण्यात आले आहे, सध्या देवगड जामसंडे शहरात अवैध धंदे (दारु, मटका, जुगार) फार मोठ्या प्रमाणत सुरु आहेत. त्यामुळे तरूण पिढी या अवैध धंद्याच्याआहारी जाताना दिसुन येत आहे. या देवगड जामसंडे शहरात बिंधास्तपणे खुले  आम दारू, मटका, जुगार चालु आहेत यासंदर्भात आपल्याकडून हे अवैध धंदे तात्काळ बंध करण्यात यावे. नाहीतर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. आपण या संदर्भात अवैध धंदे बंध करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे या निवेदनात म्हटले आहे, त्यावेळी भाजप महिला तालुकाध्यक्षा उष: कला केळुसकर,नगरसेविका तन्वी चांदोस्कर, नगरसेविका अरुणा पाटकर, तन्वी शिंदे, नगरसेविका प्रणाली माने, माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी,नगरसेविका आद्या गुमास्ते, नगरसेविका मनिषा जामसंडेकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा