You are currently viewing सावंतवाडी वीज अधिकारी कर्मचारी मारहाण प्रकरणात पाच संशयिताना न्यायालयीन कोठडी..

सावंतवाडी वीज अधिकारी कर्मचारी मारहाण प्रकरणात पाच संशयिताना न्यायालयीन कोठडी..

सावंतवाडी /-

लोडशेडिंगच्या वादातून विज अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखीन पाच जणांना ताब्यात घेतले आहे. संबंधित पाचही संपायित आज सकाळी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. दरम्यान त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

यात केतन आजगावकर, अमित गवंडळकर, अरूण भिसे, मृणाल उर्फ मुन्ना मुद्राळे, शौकत शेख आदींचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधित वीज अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तब्बल नऊ जणांविरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील अमित वेंगुर्लेकर व प्रणेश बिद्रे या दोघांना २२ एप्रिलला अटक करण्यात आली होती. दरम्यान सद्यस्थितीत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडी आहे. तर अन्य संशयिता पैकी पाच जण आज स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत ७ समायित पोलिसांच्या स्वाधीन झाले. तर अन्य दोघांना अद्याप अटक झालेली नाही, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अमलदार तोसिफ याद यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, २१ एप्रिलला मध्यरात्री वीज वितरणने अचानक नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता भारनियमन केले होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जाब विचारण्यासाठी येथील विद्युत वितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद आल्यामुळे नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. यावेळी त्यांनी कोलगाव उपकेंद्रात जाऊन त्या ठिकाणच्या अधिकारी व कर्मचान्याला धक्काबुक्की केली होती. दरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारी कामात अडथळा करून मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया आजही सुरू आहे.

अभिप्राय द्या..