You are currently viewing कै.सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवतरुण युवक मित्र मंडळ कळसुली आयोजीत क्रिकेट स्पर्धा संपन्न.;जयभवानी कणकवली संघ विजेता..

कै.सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवतरुण युवक मित्र मंडळ कळसुली आयोजीत क्रिकेट स्पर्धा संपन्न.;जयभवानी कणकवली संघ विजेता..

कणकवली /

कै.सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवतरुण युवक मित्र मंडळ कळसुली आयोजीत यांच्या संयुक्त विदयमाने कळसुली डुबरणेवाडी पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाश झोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत जय भवानी कणकवली, क्रिकेट संघाने कळसुलीच्या साई स्पोर्ट संघावर १२ धावांनी मात करत कै.सुरेश सुद्रिक स्मृती चषकावर नाव कोरले.या स्पर्धेत धनु दुखंडे याने मालिकविराचा ‘किताब पटकावला आहे.स्पर्धतील विजेता -उपविजेता संघ आणि स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकाना गौरवीण्यात आले.

सुरेश सुद्रीक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव कल्पेश सुद्रीक यांच्या संकल्पनेतू सलग नवव्या वर्षी या स्पर्धेचे उदघाटन विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग ,माजी ग्रा. प. सदस्य जिजी राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक ,संतोष मसुरकर ,हरी काणेकर ,विशाल लाडू ,बाळा भोगले ,दीपक भोगले ,दिलीप काणेकर ,ऍड भरत गावकर ,कृष्णा गावकर ,रवींद्र घोगळे,ग्रा. प.सदस्य चांदू चव्हाण ,योगेश सातवसे ,सागर शिर्के उपस्थित होते.

अभिप्राय द्या..