रत्नागिरी -/

रत्नागिरी चरवेलीतील राजेंद्र लक्ष्मण कुरतडकर यांच्या विहिरीत पडलेल्या बिबटयाला आज वनविभागाने जीवदान दिले.बिबट्या अंदाजे वय १ ते २ वर्ष वयाचा मादी जातीचा होता. त्याची लांबी -155 तर उंची 48सेमी होती.हि कार्यवाही विभागीय वन अधिकारी दि. पो. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल पाली जी. पी कांबळे, वनपाल देवरुखचे सुरेश उपरे, वनरक्षक न्हानू गावडे, संजय रणधीर यांनी केली. बिबटयास सुखरूप विहिरीतून काढून पशु वैद्यकीय अधिकारी, रत्नागिरी यांचेकडून तपासून घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page