मालवण /-
शिवसेना नेते, राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण गुरुवारी मालवण शिवसेना शाखा येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर यांच्याहस्ते करण्यात आले.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने राज्यभर सर्वत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे.
या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक मंदार केणी, दर्शना कासवकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, नंदू गवंडी, किरण वाळके, बंड्या सरमळकर, किसन मांजरेकर, दीपा शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन करून हा कार्यक्रम झाला.यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन युनिटसाठी पन्नास हजार रुपयांचे योगदान जाहीर केले.