वेंगुर्ला /-
शिरोडा गाव स्वच्छ सुंदर व पर्यावरणपूरक रहावा, या उद्देशाने शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने इमारत कर भरणाऱ्या कुटुंबांना स्वच्छताविषयक साहित्य वाटप करण्यात आले.१५ वा वित्त आयोग अनुदानातून ग्रामस्थांना डस्टबिन वाटप करण्यात आले. त्याचबरोबर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान बक्षिस रकमेतून प्रत्येक कुटुंबाला कचरा सुफली चे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरणाचा समतोल राखणे प्लास्टिक पिशवी बंद करून कापडी पिशवीचा ग्रामस्थांनी उपयोग करावा या उद्देशाने कापडी पिशवीचेही वाटप ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले.यावेळी सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, ग्रामविकास अधिकारी सुनिल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गावडे, समृद्धी धानजी, कौशिक परब, रवि पेडणेकर, स्वरूपा गावडे तसेच ग्रामस्थ आनंदी नाईक, प्रविण बर्डे, विशाखा नाईक, सुरेश भगत, सावळाराम भगत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामपंचायत शिरोडा मार्फत या स्वच्छता साहित्याचे वाटप करुन ‘स्वच्छ शिरोडा सुंदर शिरोडा’ हा संदेश ग्रामस्थांपर्यंत साहित्याच्या रूपाने देण्यात आला.