You are currently viewing तिर्लोट सोसायटी चेअरमन पद निवडणुकीत भाजपाचे सुधाकर दळवी तर,व्हाईस चेअरमन पदावर वलीद ठाकूर

तिर्लोट सोसायटी चेअरमन पद निवडणुकीत भाजपाचे सुधाकर दळवी तर,व्हाईस चेअरमन पदावर वलीद ठाकूर

देवगड /-

 तिर्लोट वि.का.स.सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज पार पडली, यामध्ये चेअरमन पदावर भारतीय जनता पक्षाचे सुधाकर दळवी आणि व्हाईस चेअरमन पदावर भारतीय जनता पक्षाचे वलीद ठाकूर विजयी झाले.
या प्रसंगी तिर्लोट सोसायटी विजयाचे शिल्पकार तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस अरिफभाई बगदादी यांनी तिर्लोट येथे विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यांच्या सोबत तिर्लोट येथील जेष्ठ नेते रमाकांत घाडी, सरपंच राजन गिरकर, रामकृष्ण जुवाटकर, अमरनाथ पडेलकर, संजय मुळम, तसेच सोसायटीचे सर्व संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..