You are currently viewing अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान व वादळसदृश्य परिस्थितीने झालेल्या पडझडीचे शासनस्तरावरून पंचनामे करून नुकसान भरपाई द्या.;मनसेची कुडाळ तहसीलदारांकडे मागणी.

अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान व वादळसदृश्य परिस्थितीने झालेल्या पडझडीचे शासनस्तरावरून पंचनामे करून नुकसान भरपाई द्या.;मनसेची कुडाळ तहसीलदारांकडे मागणी.

कुडाळ /

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.अवकाळी पावसाचा थेट परिणाम जिल्ह्यातील आंबा काजू पिकांवर झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.शिवाय या कालावधीत काही प्रमाणात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी पडझड झाल्याची उदाहरणे आहेत.तर काही ठिकाणी वीज पडून नुकसान झाल्याचे देखील दिसून आले आहे. हातावरच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवलादिल झालेले असून आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आला आहे.शेतकऱ्यांच्या या हतबलतेकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे शिष्टमंडळाने कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले.
यामध्ये पर्यावरण असमतोलीमुळे आलेल्या अवकाळी पावसास प्रशासंकीय यंत्रणेची अनास्था देखील तेवढीच कारणीभूत असून मागील चार पाच वर्षात अनियंत्रित प्रमाणात झालेली वृक्षतोड व तुलनेने पाच पट वृक्ष लागवडीबाबत प्रशासकीय यंत्रणेने दाखवलेली अनास्था ह्याचा थेट परिणाम पर्यावरणावर झालेला आहे असे तज्ज्ञांचे मत असल्याचे मनसेने निवेदनात मांडत कोरोना पार्श्वभूमीने डबघाईला आलेली अर्थव्यवस्था व त्यात अवकाळी पावसामुळे झालेले कष्टकरी जनतेचे नुकसान पाहता शेतकऱ्यांचे जणू कंबरडेच मोडले आहे अशा परिस्थितीत शेतकरी राजाला सावरण्यासाठी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकडे सहानुभूती पूर्वक पाहून ग्रामपातळीवर तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करावेत व शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणेसाठी पाठपुरावा करावा अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका सचिव राजेश टंगसाळी, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, रामा सावंत, शाखाध्यक्ष वैभव धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते

अभिप्राय द्या..