सिंधुदुर्ग /-
तेजस एक्सप्रेसला थिविम आणि कणकवली या रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, अशी मागणी शिवसेना गटनेते तथा खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. याबाबत श्री. राऊत यांनी त्यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.