You are currently viewing कळसुलीत दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न, आर्थिक उत्पन्नासाठी करण्यात आले मार्गदर्शन..

कळसुलीत दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न, आर्थिक उत्पन्नासाठी करण्यात आले मार्गदर्शन..

कणकवली /-

सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, बाळा भावे यांच्या पुढाकाराने कळसुली गावातील दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात त्यांना शासकीय योजनांच्या माहितीसह मार्गदर्शन, दरमहा मिळणारी शासकीय पेन्शन, शासकीय नोकरीसाठी लागणारी प्रमाणपत्रे कशी आणि कुठे मिळतात, तसेच आवडीच्या उद्योगधंद्यासाठी आवश्यक मदत याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या श्रम कार्ड नोंदणीसाठी उपस्थितांचे अर्ज भरून नोंदणी करण्यात आली. नोंदणी झालेल्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, बाळा भावे यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याचा लाभ 40 दिव्यांग बांधवांनी घेतला. यावेळी बाळा भिसे, कळसुली सरपंच साक्षी परब, वैद्यकीय अधिकारी डॉ. पोळ, ग्रामसेवक तेंडुलकर, मांडकुली येथील सामंत, माणगाव मधील नाईक, कळसुली ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या मेळाव्याचे यशस्वी आयोजन करून सहकार्य केल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी सुशांत दळवी, बाळा भावे यांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..