सिंधुदुर्गनगरी/-

महाराष्‍ट्र राज्‍य महसुल कर्मचारी संघटना जिल्‍हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलन करत निदर्शने केली.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी ४ एप्रिल पासून संप पुकारला आहे.या संपास सुरुवात झाली असून १०० टक्के कर्मचारी या संपात बेमुदत संपावर आहेत असा दावा महसुल संघटनेच्या पदाधिकारी यांनी केला आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य महसूल कर्मचारी संघटना यांचे वतीने मंत्रालयीन स्‍तरावर अव्‍वल कारकून सवंर्गात पदान्‍नतीचे प्रलंबित असलेले प्रस्‍ताव, विभाग निहाय मान्‍यता देवून नायब तहसिलदार पदोन्‍नतीचे आदेश तात्‍काळ निर्गमित करणे , महसूल सहायकांची , रिक्‍त पदे तातडीने भरणे,अव्‍वल कारकुन, मंडळ अधिकारी नायब तहसिलदार पदी पदोन्‍नती देणे, इत्‍यादी मागण्‍यांसाठी आज पासून बेमुदत संप चालू करणेत आलेला आहे.
दिनांक २१ मार्च रोजी दुपारचे जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाचे द्वारावर निदर्शने केली.
दि.२३ मार्च रोजी काळया फीती लावून कामे केली,

शासनाचा निषेध म्‍हणून दिनांक २८ मार्च २०२२ रोजी रक्‍तदान शिबीर आयोजीत करुन रक्‍त संकलन केल. तरीही शासनाकडुन दखल न घेतल्‍यामुळे महाराष्‍ट्र राज्‍य महसूल कर्मचारी संघटना जिल्‍हा सिंधुदुर्गच्या वतीने सर्वांनी संपात सहभागी होण्‍याचा निर्णय घेतलेला असून आज ४ एप्रिल २०२२ पासून सिंधुदुर्ग जिल्‍हयातील सर्व पदोन्‍नत नायब तहसिलदार, अव्‍वल कारकून, महसूल सहायक , वाहन चालक , इत्‍यादी १०० टक्के संपामध्‍ये सहभागी झालेले आहेत. महसूल कर्मचारी संघटनेकडून सर्व तहलिसदार कार्यालय, जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्‍यात आलेली असून जिल्‍हयातील ३०० पेक्षा जास्‍त महसूल कर्मचारी व १९ नायब तहसिलदार बेमुदत संपावर गेलेले असून सिंधुदुर्ग जिल्‍हयामध्‍ये संप १०० टक्के यशस्‍वी झालेला आहे. असा दावा संघटनेच्या पदाधिकारी यांनी केला आहे. तसेच महसूल कर्मचारी संघटनेतर्फे संपामुळे नागरिकांचे होणारे गैरसोई बद्दल दिलगीरी देखील व्‍यक्‍त करणेत आली आहे. तसेच राज्‍य संघटनेकडुन पुढील निर्देश प्राप्‍त होईपर्यंत दररोज जिल्‍हा स्‍तरावर निदर्शने करण्‍यात येणार असल्याचे यावेळी महसुल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्यवान मालवे यांनी सांगितले. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍य महसुल अधिकारी कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक संतोष खरात , अध्यक्ष सत्‍यवान माळवे श्रीम.दर्शना चव्‍हाण नायब तहसिलदार, शिवराज चव्‍हाण सरचिटणीस , संभाजी खाडे कार्याध्‍यक्ष, रमेश कांबळे , उमेश काळे , स्‍वप्निल प्रभु , शाम लाखे कोषाध्‍यक्ष, अशोक पोळ, मुख्‍यालय अध्‍यक्ष ,राजेश्‍वर राठोड ,नरेंद्र एडके अध्‍यक्ष कुडाळ, महेश चव्‍हाण प्रसिध्‍दी प्रमुख , उमेश राठोड मंडळ अधिकारी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page